तू नसावी सोबत असा दिवस नसावा,
तूच असावी सोबत,
असा प्रत्येक क्षण असावा,
भेट तुझी निरंतर असावी परंतु,
घडाळ्याच्या काट्यानांही थांबण्यास खंत नसावा।
भेट तुझी देई मज सुंदर विसावा,
क्षण हा आयुष्यात माझ्या रोज असावा,
भेटीला आपल्या कुणाचा नकार नसावा,
असा क्षण माझ्या डोळ्यांनी रोज मी पहावा।
झाली मैत्री हि अतूट ह्यात दुरावा नसावा,
झालो तुझ्यात जितका मी बेधुंद,
तितका दुसरा कोणी नसावा,
लावले वेड ज्याने तुला प्रेमाचे,
तो फक्त मीच असावा।
तू नसावी सोबत असा दिवस नसावा,
तूच असावी सोबत,
असा प्रत्येक क्षण असावा।
🎭© सchin Poटे 🎭
Khup sundar
ReplyDeleteThx Ammruta
Delete