Tuesday, November 22, 2016

तू नसावी सोबत....😘

तू नसावी सोबत असा दिवस नसावा,
तूच असावी सोबत,
असा प्रत्येक क्षण असावा,
भेट तुझी निरंतर असावी परंतु, 
घडाळ्याच्या काट्यानांही थांबण्यास खंत नसावा।

भेट तुझी देई मज सुंदर विसावा,
क्षण हा आयुष्यात माझ्या रोज असावा,
भेटीला आपल्या कुणाचा नकार नसावा,
असा क्षण माझ्या डोळ्यांनी रोज मी पहावा।

झाली मैत्री हि अतूट ह्यात दुरावा नसावा,
झालो तुझ्यात जितका मी बेधुंद,
तितका दुसरा कोणी नसावा,
लावले वेड ज्याने तुला प्रेमाचे, 
तो फक्त मीच असावा।

तू नसावी सोबत असा दिवस नसावा,
तूच असावी सोबत,
असा प्रत्येक क्षण असावा।

🎭© सchin Poटे 🎭

Sunday, October 2, 2016

निर्मळ पाण्यासारखी तू...👌

निर्मळ पाण्यासारखी तू,
अल्लडशी आमची मैत्रीण तू,
प्रेमळ तू, लाडकी तू,
निरागस तू, निस्वार्थ तू,
तुझ्या मैत्रीच्या प्रेमात पडाव इतकी सुंदर तू।

तूच मैत्रीचा थंडगार वारा,
तूच मैत्रीच्या सावलीत सहारा,
तूच सागर मैत्रीचा,
तूच मैत्रीचा किनारा।

नेहमीच राहो हसू तुझ्या ओठांवरती,
दिलखुलास हो जरा आनंदी जगण्यासाठी,
धन्यवाद त्या मातेला,
जिने मैत्रीण दिली अशी आम्हाला ।

🎭© सchin Poटे 🎭

निरागस आहेस तू...

निरागस आहेस तू,
निस्वार्थ आहेस तू,
प्रेमाच्या भाषेत सांगायचं झालं तर
गुलाबासारखी सुंदर आहेस तू,

प्रिय आहेस तू, प्रेमळ आहेस तू,
अजून काय काय लिहू तुझ्यासाठी,
तुझ्या प्रेमात पडाव इतकी गोड आहेस तू।

💓सचिन 💓

गमो का सागर...😢

गमो का सागर ना देख,
'तेरी खुषीयों कि बुंदे आज भी
आंखे नम कर देती हैं।

🎭© सchin Poटे 🎭,

ये गुजरे हुवे पल ...

ये गुजरे हुवे पल जरा मुड के तोह देख
तुने मेरी हालत क्या कि हैं।
आशीक बना के छोडा हैं उस नगरी मैं
जहाँ दिल पत्थर के होते हैं।

💓सचिन 💓

काय झाले माहित नाही...

काय झाले माहित नाही,
पण तुझ्या मैत्री शिवाय आता जमतच नाही।
झाला असेल थोडा विसर तुझा,
किंतु आराम मनाला माझ्याही नाही।

तू नको ग रागावत जाऊ असं,
मला तुझ्याशिवाय कुणी नाही।
चुकले असेल तर घे समजून,
मला समजून घेणार तुझ्याशिवाय कुणी नाही।

हम हम ना थे अगर...😍


हम हम ना थे अगर
दोस्त तू ना होता,
सपनो के सागर का
किनारा ना होता।

दोस्ती यारी तेरी अजीब
होगी लोगो के लिये,
मुझे तो अजीब दोस्ती
से हि लगावं हैं।

तू हमेशा कहती थी कि
तुझं मैं कूछ तो बात हैं,
लेकिन सच तो ये हैं
के तु मेरे साथ हैं।

हर एक दोस्त अलग होता हैं,
कोई प्यार बाटता हैं,
तो कोई दुखोको सवारता हैं,
मगर ये दोस्त तू
तो हर कदम पर
मुझे कूछ नया सिखाता हैं।
मुझे कूछ नया सिखाता हैं।

🎭© सchin Poटे 🎭,

हिला नाव काय मी देऊ?

अशी कशी हि मैत्री आपली 
हिला नाव काय मी देऊ?
वेड लागले असे कसे हे,
तुला नजरेत कसा मी ठेऊ?

थरकाप झाला तुझा माझा हि,
शब्द पुढे कसे  नेऊ?
वेड लागले मला तुझ्या प्रेमाची,
सांग तुझ्यात कसा मी वाहून जाऊ?

अश्या प्रेमाची सवयच नव्हती,
तुला कसे मी दाखवून देऊ?
अशी कशी हि मैत्री आपली 
हिला नाव काय मी देऊ?
हिला नाव काय मी देऊ?

🎭© सchin Poटे 🎭,

आलीस अशी आयुष्यात रंग सप्त घेऊन...😍

आलीस अशी आयुष्यात रंग सप्त घेऊन,
प्रेमाच्या समुद्राची उंच लाट घेऊन...
विस्कटलेल्या आयुष्यात नातं नव घेऊन,
भरकटलेल्या रस्त्यात मार्ग नवा घेऊन...

प्रेमळ हात हातात देऊन,
नि शब्द होऊन,
बरेच काही बोलून ...

टिमटिमनाऱ्या डोळ्यांना आस नवी देऊन,
ना एक झालो जरी, तरीही साथ आयुष्याची घेऊन,
आलीस अशी आयुष्यात रंग सप्त घेऊन...
आलीस अशी आयुष्यात रंग सप्त घेऊन...😍

💞 ©सचिन 💞

Saturday, October 1, 2016

मन सुंदर जिथे ....💐


मन सुंदर जिथे
तिथे तू आहेस,
ह्रुदय सुंदर
तिथे तू आहेस,
संकटात साथ हवी जिथे
तिथे तू आहेस,
जिथे मनातल्या प्रश्नांची
गुंतागुंत आहे, 
तिथे प्रश्नांना निवारण तू आहेस,
जिथे निस्वार्थ प्रेम आहे
तिथे तू आहेस,
जिथे प्रश्न येतील मैत्रीच्या हक्कांचा
तिथे तू आहेस,
.
म्हणून.....

नात्यास नाव आपुल्या
देऊ नकोस काही,
साऱ्याच चांदण्यांची
जगतास जाण नाही।

🎭©सchin Poटे🎭

गुलाबी ओठांवरती माझी😘

गुलाबी ओठावरती माझी
तर्जनी येऊदे,
शब्द नको येऊन देउ मुखातून,
मला तुझी नजर वाचूदे।

💓 ©सchin Poटे💓

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रयत्नात "उमंग"

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या 
तयारीसाठी 92.7 FM ने आयोजित केलेल्या भव्य चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये "उमंग" "उम्मीद" चा सहभाग होता हे पाहून मनाला खूप मोठं समाधान मिळाल आहे।

काम जरी कठीण दिसत होते तरी आपण ते सहज पार पडले ह्याचे मला नवल वाटत।

३५०हुन अधिक मुलांना भांडुप, पवई, वरून घेऊन जाऊन तिथल्या हजारो मुलांमध्ये बसवून, त्या हजारो मधुन आपलेच मुलं शोधून पुन्हा त्यांच्या घरापर्यंत सोडणे हि काही साधी गोष्ट नव्हे। भल्या भल्या संस्थेने तोंडात बोट घालावी अशी बाब आहे।

तिथे टीमचे काम, टीम मधल्या प्रत्येक सदस्यांची आपल्या जबाबदारीकडे पाहण्याचा तो वेगळा दृष्टिकोन, ह्या सर्व गोष्टी निदर्शनात येतात आणि हे पाहून गर्वाने लोकांना सांगावस वाटत कि... हा मी उमंगचा सदस्य आहे।

उमंगच्या मेंबरची हजेरी जरी जास्त असली तरीही उम्मीदची पाठ थोपवावी अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे।

उम्मीद तुमच्या ह्या नेहमीच्या निस्वार्थ कामगिरीला उमंग कडून मानाचा मुजरा।🙏🏻

आपण सगळे जे काही करतो आहोत त्याने आपला दर्जा समाजात उंचवत तर आहेच परंतु आता त्या दर्जाला टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे।

नक्कीच आपण आपली कामं हि अशीच चांगल्या पद्धतीने पार पाडत राहू, समाजाला आपलं जे देण आहे ते देत राहू।

त्यासाठी परमेश्वरा तू सतत सोबत राह

हीच तुझ्या चरणी प्रार्थना।🙏🏻

मित्रांचा सहवास... होताच सुंदर...

नमस्कार,

गेल्या कित्तेक दिवसात बरेच वेळा आपण भेटलो,
परंतु प्रत्येक दिवस हा नवाच वाटत होता, 
बऱ्याच गप्पा, बऱ्याच भेटी,
तरी मित्रमेळावा हा हवाच होता,
तरी मित्रमेळावा हा हवाच होता....!!!

आपली हि भेट कधीच न विसारण्या सारखी होती।
प्रेम, प्यार, इश्क, मोहब्बत सारख्या शब्दांच पावला पावलावर दर्शन होत होत,
मित्रांमध्ये गुंतुन जाणे हेच खरे जीवन,
मित्र हीच खरी संपत्ती असे वाटू लागले।
प्रत्येक क्षण हा कुठे तरी फ्रेम करून ठेवायला हवा अस वाटत आहे, 
रोजच्या जीवनाला वैतागलेल्या जर का असे मित्र मिळाले तर त्याच्या जीवनाची, जीवन जगण्याची व्याख्याच बदलून जाईल,
माझं तुझ्यावरच आणि तुझं माझ्यावरच प्रेम व्यक्त करण्याची भाषाच हि तुम्हा सगळ्यांची वेगळी आहे, जी आज मनात घर करून बसली आहे।

दारात आलेल्या यमाने जर का शेवटची इच्छा विचारली,
तर नक्कीच २०१६ मधल्या मे महिन्यातली हि २ दिवस मागेल,
आणि पुन्हा एकदा एक आयुष्य जगेल।

कळत न कळत काही चुकले असेल तर माफ कर असे नाही म्हणणार,
पण चुकलं असेल तर एकदा ती चूक सुधारण्याचा एक संधी दे असे म्हणेल।

आणि त्यासाठी नक्कीच
तुला /तुम्हाला परत भेटावे लागेल।

काय मग भेटायचं ना...?

💓सचिन💓

निकला हुवा था बरसात मैं घर अपने...

फॉर अंकिता,

निकला हुवा था बरसात मैं घर अपने,
ये सोच कर के इंतजार मैं मेरे वो बेठी होगी,
सपने सजाये बरसात कि बुंद को
उंगलियोंसे लपेट बैठी होगी,

मैं दिख जाऊ कही दूर से हि उसे,
मैं दिख जाऊ कही दूर से हि उसे,
वो नाजरोको मेरी नजरोसे
मिलानेकी कोशिश मैं लगी होगी।

💓सचिन💓

आई तुझं "आई" असं नाव ठेवलं कोणी ?

आई तुझं "आई" अस नाव ठेवलं कोणी??
नाही अपेक्षा, नाही तक्रार,
अस वागायला शिकवत का कोणी?

पोटभर जेवायला ताजे ताजे देते तू सगळ्यांना,
स्वतःसाठी मात्र शिळेच असते तुझ्या ताटाला,
आई माझी माय माझी तुझी महिमा किती छान ग,
कवियात्रींना पण दिसे तू दुधावरची साय ग,

घरात आल्या पाहुण्यांना नेसवते साडी छान ग,
पदर तुझा पण फाटला, तुला दिसत कस न्हाय ग?
माझं बाळ, माझं शोन्या दिवस रात्र बोलत राहतेस
थकत कशी न्हाय ग? 
समुद्रा एवढे प्रेम देतेस तुला मिळते तरी काय ग?

आई तुझं आई अस नाव ठेवलं कोणी??
नाही अपेक्षा, नाही तक्रार,
अस वागायला शिकवत का ग तुला कोणी?

🎭©सchin Poटे🎭

असे का ??

असे का ....???🤔

(जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा...😍)

तू फक्त मैत्रिण नाही
मैत्री पलीकडे आहेस,
तू फक्त प्रेम नाही,
तू प्रेमा पलीकडे आहेस,
तू सुख नाही तू सुखाच्या
पलीकडे आहेस।

तू कधी इंद्रधनुष्य आहेस,
कधी आकाशातील तेजमय
तारा आहेस,
कधी बेधुंद वारा,
तर कधी सागरी किनारा आहेस।

(जेव्हा प्रेम कमी होते तेव्हा...☹)

अलीकडे तू समजून घेत नाही,
तू समजण्या पलीकडे आहेस,
तू पहिल्यासारखी नाही,
तू इतरां सारखीच आहेस।

तू पहिल्यासारखी नाही,
तू आता इतरांची आहेस,

मजला तू नको,
तू तुझ्याच मनाची राणी आहेस।
तू तुझ्याच मनाची राणी आहेस।

🎭©सchin Poटे🎭

💞ती मला नेहमीच आवडायची🙈😍

💞मला ती नेहमीच आवडायची😍

तिची नेहमीच मी वाट पहायची
अन ति नेहमी
वेळे नंतरच भेटायची
आणि कारण तर तिची
नेहमीच तयार असायची।

भर पावसात यावं लागलं
म्हणून मुरका मारून बसायची,
ओलेचिंब होऊन जवळी यायची
अन तिला पाहताच जवळी येताना,
मी हि तिच्यात सामावून जायचो।

ती नेहमी वेग वेगळ्या
रूपातच दिसायची,
दिवाळी-दसऱ्याला
छान सजायची,
प्रत्येकाच्या सोबती असायची।

कित्तेक वेळेस रागाची बळी पडायची,
पण ती मुळीच नाही बोलायची,
दोष तिचा नसूनही
साऱ्यांचा रोष ती
आपल्यावरच ओढून घेयाची।

कधी मनुष्याच्या स्वार्थसाठी
केले तिने सहन,
तर कधी दगडांची शिकार व्हायची,
आले संकट कितीही
तरी नाही थांबायची।

ऊन असो कि असो पावसाळा
मला ती रोज भेटायची।

ती 🚃सकाळची ८.१३ ची ट्रेन....
मला नेहमीच आवडायची।
💗💓❣💞💓❣💞💗

🎭©सchin Poटे 🎭

🌱" १०३ वृक्षांचा विक्रम "🌱

🌱" १०३ वृक्षांचा विक्रम "🌱

जंगल विभाग- महाराष्ट्र सरकार आणि हरियाली -NGO मार्फत आयोजित केलेल्या ह्या प्रयोगाला "उमंग" "उम्मीद" ने त्यांच्या अमूल्य वेळेतुन वेळ काढून आपण ह्या समाजाचे नागरीक आहोत आणि झाडे लावणे आणि ती जगवणे हे आपले कर्त्यव्य आहे हे लक्षात घेता ह्या सुंदर अश्या कार्यासाठी एक पाऊल उचलले आहे।

आज ३जुलै २०१६ हा कार्यक्रम आम्हा सर्वांच्या लक्ष्यात राहणार आहे। आयुष्याला एक वेगळे वळण आम्हाला नक्कीच ह्या कार्यातून मिळेल। झाडे तोडायला ३०मिनिटे सुद्धा भरपूर होतात परंतु तेच झाड लहानाचे मोठे करण्यासाठी लागणारी मेहनत हि खूप मोठी आहे ह्याची जाणीव आम्हाला आज झाली। एक छोटेसे रोप लावताना ते रोप कसे जगेल, अतिपावसाच्या प्रवाहात वाहून जाणार नाही ह्या सर्वांची दक्षता घेऊन आज आम्ही १०३ रोप लावले। 

रोप लावायला सुरुवात करण्या अगोदर आम्ही ३०० ते ४०० रोप नक्कीच लावू असे वाटले होते। परंतु ते रोप लावताना बऱ्याच बारीक बारीक गोष्टींवर लक्ष द्यावे लागते हे पाहताच आम्हाला जास्तीत जास्त झाड लावने हे लक्ष न ठरवता आपल्याला कमी परंतु ती रोप पुढे वाढायला हवी ह्या पद्धतीने लावायला हवी असे ठरले। 

फक्त १०३ रोप लावताना आम्ही बरेच कष्ट केले परंतु लाखो लोकांना लागणाऱ्या रोजची भाजीपाले पुरवण्यासाठी शेतकऱ्यांची मेहनत किती असते ह्याचा अंदाज लावणे कठीण आहे। 

मातीत काम करून शेतकऱ्याची मेहनत हि आज डोळ्यासमोर आली। शेतकऱ्यांच्या ह्या कामगिरीला आणि "हरियाली" सारख्या संस्थेचे रोप लावून त्याचे झाड कर्में ह्या कार्याला *"उमंग" "उम्मीद"* कडून साष्टांग नमस्कार। 

   🌅उमंग - 🌻उम्मीद

।।साद तुमची साथ आमची।।

वेड वेड्या मैत्रीला कुठे ठेऊ साठवून...


वेड वेड्या मैत्रीला कुठे ठेऊ साठवून,
तुझ्या माझ्या प्रेमाला कसे ठेऊ जपून,
आठवते जेव्हा जेव्हा ती भेट आपली,
मला आनंदमय वाटत।
समुद्राच्या पाण्याने जणू
भरून आल्या सारखं वाटत।

वेड वेड्या तुझ्या मैत्रीने
भरून गेल्यासारखं वाटत,
प्रेम तुझं मला आता
आयुष्याच्या शिदोरी सारखं वाटत।

🎭सchin Poटे🎭

मला नाही आवडत तू रुसलेली...


मला नाही आवडत तू रुसलेली,
कोमजलेल्या फुलासारखी होऊन बसलेली,
शब्दांच्या जाळ्यात गुरफटलेली,
मनाच्या काळोखात हरवलेली।

🎭©सchin Poटे🎭

मीनल सोबत कवितेत...

माझी प्रिय मैत्रीण मीनल आणि माझी सतत एकमेका सोबत गप्पा मारत असताना शब्दांची देवाण घेवाण होते, त्यातल्या २ ओळी...

मीनल....

जवळी येऊनी नजरेच्या नशेत गुंतशील असा ...                 

अन शब्दाविना या अबोल प्रीतिस जाणशील कसा ..

सचिन...

शब्दाविना तुझ्या प्रितीला ओळखून घेईल मी,

ओठावरच्या हालचालीचा समजून जाईल मी।

'तेरी अनकही बांतो ने मेरे दिल को छुवा...😍

'तेरी अनकही बातो ने मेरे दिल को छुवा,

छुते ही लबोने दिल से कहा,

तुम हो मेरे अब दूर ना रहा जाये,

ना मिलो जो तुम दिन गुजारा ना जाये।

तुम अब हो गये हो इस दिल के,

ना जाणे मगर कब हम आपना दिल तुम पे हारे,

प्यार से जादा 'तेरी दोस्ती के मारे।

हा हूं मैं थोडा पागल जो मैंने तुझाको चुना।😘

🎭©सchin Poटे🎭

मैत्रीला हवी तशी सूट...👌

मैत्रीला हवी तशी सूट अन
हवं तितकं बांधून हि घेतात,
पटलं तर वाह वा अन नाहीतर
सरळ तोंडावर बोलतात।

गरज पडली तर मित्रासाठी धावून येतात,
यशाची पायरी चढता चढता मित्राला हि सोबत घेऊन जातात,
रक्ताच्या नात्याला जपावं तितकच
आपलंसं करून जातात।

प्रत्येक शब्दाला खूप हसवतात,
अन प्रत्येक क्षण इतका सुंदर बनवता कि
भेट न झाली म्हणून रडवतात।

मला फक्त तुमच्याच मैत्रीचं हेवा आहे,
कदाचित मागच्या जन्मातील केलेल्या
चांगल्या कामाचा हा दुवा आहे।

माझं फक्त एकच सांगणं आहे,
भेटी फक्त आपल्या अश्या सतत राहुद्या,
मैत्रीच्या आठवणींच्या साठवणीत
मला सतत वाहुद्या।

तूच दिलेस जीवन, तूच दिले मित्र असे देवा,
तुमची मैत्री अन तुम्ही मनाने श्रीमंत आहात,
मला फक्त तुमचाच करून ठेवा।
मला फक्त तुमचाच करून ठेवा।

                      ........🎭©सchin Poटे🎭

काल ती रागवली होती...😑

काल ती रागवली होती,
म्हणून तिच्यासाठी...

काय झाले माहित नाही,
पण तुझ्या मैत्री शिवाय आता जमतच नाही।

झाला असेल थोडा विसर तुझा,
किंतु आराम मनाला माझ्याही नाही।

तू नको ग रागावत जाऊ असं,
मला तुझ्याशिवाय कुणी नाही।

चुकले असेल तर घे समजून,
मला समजून घेणार तुझ्याशिवाय कुणी नाही।

💓©सchin Poटे💓

प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं...

प्रथमच मला एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावले गेले होते। वयाच्या २९व्या वर्षी पाहुणे म्हणून बोलावणं म्हणजे जरा जास्तच अवघडलेले झालं होतं। मी माझे मित्र सुद्धा सोबत होते। कल्पेश, मीनल, प्रशांत हा आमचा पहिलाच अनुभव। एकाच वर्गात लहानपणापासून बसणारे आम्ही चक्क एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गेलो हे खूप आनंदी दायी होते।

आम्हाला कार्यक्रमाला बोलावणारे कल्पेशचे नातेवाईकच होते म्हणून आमचा पाहुणचार तसा छानच झाला। आम्ही येणार ह्यासाठी तिथले रहिवाशी कित्तेक वेळ वाट पाहत होते। प्रमुख पाहुणे कोण आहेत, कसे आहेत असे प्रश्न नक्कीच त्यांच्या मनात घर करून बसले होते। कोणीतरी वयाने मोठे, प्राध्यापक, नगरसेवक वगैरे कोणी असेल असे त्यांना वाटले असावे। परंतु आम्हा चौघांना पाहून त्यांनी आश्चर्याने आमच्याकडे पहिले असावे।

आम्हाला उमंगचे कार्यकर्ते म्हणून बोलावले होते । आम्ही आमचा ५ वर्षाचा प्रवास कसा केला हे त्यांच्या समोर मांडायच होत आणि त्यांच्या नवीन कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला बोलावले होते।

(तिथले भाषण)

नमस्कार, 

मी सचिन पोटे। इथे बसलेल्या सर्व मान्यवरांचा आणि इथे जमलेल्या गावकऱ्यांचा मानापासून आभार मानतो कि त्यांनी आम्हाला इथे यऊन २ शब्द बोलण्याची संधी दिली। आमचे मत, आमचे अनुभव, आमचे विचार तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा मार्ग उभा केला त्यासाठी ह्या संस्थेचा मी खूप आभारी आहे।

बऱ्याच गोष्टी समजण्या पलीकडच्या आहेत पण त्या अश्या का हे समजून घेण्याला आपण इथे आलो आहोत। चांगले वाईट काय हे सगळ्यांनाच कळात परंतु कळतंय पण वळत नाही अशी दशा आज आपली झाली आहे।

इथे बसलेल्या प्रत्येकाला वाटत असेल किंवा आहे वाटत आहे की मी असे काहीतरी करावं कि कि जेणे करून मला लोकांनी माझ्याशी बोलताना माझ्या कडे पाहताना आदराने पाहायला हवे। तो एक सन्मान मला समजत मिळायला हवा। माझ्याकडे बघताना आदरयुक्त भीती लोकांच्या मनात वाटायला हावि। पण मग त्या गोष्टी कश्या साध्य करता येतील ह्या वर आपण विचार विनिमय करायला हवा ।

मी उमंग ह्या संस्थेचा कार्यकर्ता आहे। गेल्या सलग ५ वर्षी पासून ह्या संस्थे सोबत मी काम करतोय। मला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला गेला की काय मिळत रे समाज कार्य करून, फॅमिली ला वेळ द्या घरातले उद्योग काय कमी असतात का तिकडे जरा लक्ष द्या।  उगाच आयुष्य वाया घालवू नका।

मी त्या वेळेला त्याच क्षणी त्या व्यक्ती ला हे सांगितलं की तुम्ही त्या विचारांचे व्यक्ती आहात जी माणसे इतरांच्या चांगल्या मध्ये कधीच सह्भाक करून घेऊ शकत नाही। तुम्ही केव्हाच चांगले करू शकणार नाही नाही आणि कुणाला करून हि देणार नाही।

काय मिळते मला हे समाज कार्य करून? 

आनंद मिळतो,

समाधान मिळत,

प्रेरणा मिळते,

प्रॉसहन मिळत,

आयुष्य कडे पाहण्याचा एक वेगळा दृहतीने मिळतो,

काहीतरी चांगले करण्याच्या कित्तेक संधी मिळतात,

आणि मी करत असलेल्या चांगल्या कामामुळे माझ्या परिवाराच्या चेहर्यावरचा तो आनंद मिळतो,

माझ्या मुलांना माझ्या कडे पाहताना गर्व वाटावा म्हणून ही धडपड आहे। जॉब काम धंदा फॅमिली मित्र समाज ह्या सगळ्या गोष्टी कधीच तुमच्या पासून दूर हिणार नाही। ही जीवनाची सायकल आहे ती काही थांबणार नाही। 

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणतेही केलेलं काम वाया जात नाही त्या केलेल्या गोष्टीने एकतर आपण जिंकतो किंवा काही तरी शिकतो परंतु माणूस काढिच हारत नाही। 

*नाते कितीही वाईट असले तरी*
*ते कधीही तोडू नका*,
*कारण पाणी कितीही घाण*
*असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते*...
*"माणुस*" *स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे*...,

*लोकांच काय लोक " चुका" तर "देवात" पण काढतात*.

रतन टाटा छान बोलतात कि लोखंडाचा गंजच लोखंडाचा नष्ट करतो, तसेच आपले विचारच आपल्याला नष्ट करू शकतात म्हणून विचार बदला आयुष्य नक्कीच बदलेल।

धन्यवाद...

काय लिहू तुझ्या बद्दल... 😢

काय लिहू तुझ्या बद्दल,
बोलायला तस बरेच काही आहे,
सुरवात करू कुठून कळत नाही,
पण सांगायचं बरंच काही आहे।

पहिल्या भेटी पासून आज वरच,
तुझं माझं घेणं देणं आहे,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला,
तुझ्या सोबत घालवण आहे।

तू तू मी मी करता करता माझं तुला,
आणि तुला माझं होऊन जाणं आहे,
प्रेमाच्या या उत्तुंग समुद्रात,
सामावून तुला घेणं आहे।

का असावं नात आपले असे,
ते आज जाणून घेणं आहे,
तुझ्या माझ्या नात्याला
आज प्रेमाची साक्ष देणं आहे।

आपल्या या प्रेमळ प्रवासाला,
मोहर सोन्याची देणे आहे,
रंग हिरवा दाखवून,
प्रवासाला पुढे नेणं आहे।
प्रवासाला पुढे नेणं आहे।

🎭© सchin Poटे 🎭

होऊन वेड्या मना...😇

😍होऊन वेड्या मना...

तूच आहे माझी आणि मी आहे तुझा,💑
प्रेम कर वेड्यासारखे होईल मी कायमचा,💏
प्रेम, प्यार, इश्क असे नाते तुझं माझं,💘
मिठीत घे मला कर कमी मनावरचं ओझं,🤗

भेट दे अशी, वेड लागेल तुझे पुन्हा,😘
दूर गेलो तुझ्या पासून हाच माझा गुन्हा,😒
घे समजून भावनांना हा प्रेमी आहे जुना,
घे जवळी आता मज, होऊन वेड्या मना,
घे जवळी आता मज, होऊन वेड्या मना,

🎭©सchin Poटे 🎭

वाढदिवस माझा असा साजरा केला ...!!!

Feedback- 

काय होतास तू काय झालास तू,
मित्रांच्या मनात घर करून गेलास तू,
मित्रांच्या मैत्रीचा दिवाना तू,
मित्रांच्या भेटीचा भुकेला तू,
काय होतास तू काय झालास तू...।😘

🙏🏻सॉरी थोडा उशिरा रिप्लाय करतोय.

माझा 🎂वाढदिवस साजरा करण्यासाठी जे तुम्ही केले आहे त्याला कसे शब्दात मांडू हेच कळत नव्हतं। शब्दात मांडून तुम्ही केलेल्या गोष्टीची परतफेड केल्यासारखे नको वाटायला म्हणून गप्प होतो। वाढदिवस आहे म्हणून आपल्याला भेटायचे हे माहित होते व माझं काय करतील आणि काय नाही ह्याची भीती पण होती, पण ते तुम्ही मी घरात घुसतांना दाखवून दिले, नशीब लाईट बंद करून नाही मारलं। बेस्ट वेलकमसाठी बिग थँक्स।

नेहमीसारखी तीच टीम, हाताची बोटे कमी पडावी इतकी मेजोरीटी होती, म्हणून भीती अजून वाढली। रूम मध्ये आल्यानंतर २ मिनिटांनी सगळे जणू कर्फु लागल्यासारखे गायब झाले, २ मानस बाजूला बसवून ठेवली होती, माझ्यावर जणू निगराणी ठेवण्यासाठी एकीकडे मंगेश उर्फ सगळ्यांचा दादा आणि एकीकडे मानसी बेन, हलायला चान्स दिलाच नाही। बाहेर नेमके काय चालू आहे हे पाहावे म्हणून जागेवरून उठलो तर सगळे असे अंगावर धावून आले जणूकाही मी अमृताच्या घरातली किमती वस्तू उचलून निघालो कि काय। हि काळागृहाची शिक्षा केव्हा संपेल असे झालं होतं।  हॉल मधली हालचाल काही काळूनच देत नव्हती म्हणून किचन मध्ये काय चाललंय ते पाहावं म्हणून किचन मध्ये गेलो तर राहुल ने मला अक्षरशः असे हाकलले जणू काही मी चुकून लेडीस टॉयलेट मध्ये आलोय कि काय। 😂😂

🕗बराच वेळ हॉल मध्ये बसलेलो, एक एक समोर येवून मनातल्या मनात जणू बोलत असावा "🐐बकरा आज हलाल होणार " असे बोलून पुढे जात होता।

बऱ्याच वेळे नंतर 🗣"चला रे सुरु करू" आवाज आला आणि हृदयाचे❤ ठोके अतुलच्या 🚗💨💨💨गाडीच्या स्पीडने धावू लागले। डोळ्यावरती ओढणी बांधली, आंधळी कोशिंबीर खेळायची आता माझ्यावर राज्य आलंय आणि आता सगळ्यांना पाकडायचं कि काय ? नशीब तस काही नव्हतं।

पण त्यादिवसाचा तो पहिला surprise होता। काय येईल डोळ्यासमोर काहीच अंदाज लावता येत नव्हतं। डोळ्यावरची पट्टी निघाली न डोळ्यासमोर 🚼अवनी 🙋🏻अंकिता दिसली, १०सेकंदासाठी स्तब्ध झालो। नुकताच घरातून येताना जरी दोघींना भेटून आलो असलो तरी बऱ्याच दिवसांनी आज हे मला भेटायला आले असं वाटलं। डोळे पाणावले होते, ह्या सुंदर surprise साठी खूप आभारी आहे तुमचा। थँक्स RJ आणि नितीन त्यांना सांभाळून आणलेस। त्या नंतरचे स्पेसिल सरबत, गिफ्ट्स मध्यल्या भांडी आजही घासावि लागतात, 😁ISI मार्क असलेली शेगडी मला गिफ्ट भेटेल असे मला कधी वाटलंच नव्हतं, सध्या त्या भांड्यावर अवनीचा ताबा आहे। माझ्या बायको ने केलेल्या msg ला तुम्ही इतके मनावर घेऊन चक्क huggies मला गिफ्ट केले हे तर फार गमतीदारच होत।😜😜😜

📝माझ्या कविता खरंच चांगल्या आहेत आणि त्याला मी जपून ठेवायला हवे असे सतत सांगणारे माझे हितचिंतक तुम्ही चक्क बुक बनवून मला गिफ्ट केले। सातव्या आसमानात होतो मी ते पाहून। मी जे करतोय ते खरंच तुम्हाला आवडतंय आणि ते मी इतकं मनावर नाही घेतले कधी, परंतु तुम्ही त्याला अगदी फुलासारखा जपून माझ्या समोर मांडले त्यासाठी खूप खूप थँक्स। मीच केलेल्या कविता मला पुन्हा पुन्हा वाचायला आवडत होत्या। इतकं सुंदर गिफ्टसाठी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार। ह्या मागे केलेली अमृता तुझी मेहनत रंगात आली। 😘

✈दूर देशी गेला बाबाच्या कविता आपण वाचत आलो।👴🏻 बाबा आणि👶🏻 बाळाचं नातं किती नाजूक असतं हे ऐकले आहे । बाबा आपल्या कुटुंबासाठी काय काय करतात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि तुम्ही देखील करत आहातच। अवनीच्या तोंडून आज पर्यंत बाबाबाबाबा असेच ऐकलं होतं। पण अवनी कडून अश्या पद्धतीने bday wish मिळेल वाटलं नव्हतं। कधी imagine पण नाही केले की ही बोलायला लागल्यावर कसे wish करेल मला। पण नंदाने तिच्या माधम्यातून मला ऐकवले त्यासाठी थँक्स नंदा। अतिशय सुंदर विचारांची मांडणी, शब्दांचा सुंदर उपयोग, खूप छान कॉन्सेप्ट आणि आवाज अप्रतिम।😘😘😘 
सिद्धार्थ तुझी मेहनत म्हणजे नंदाच्या कामाचा श्री गणेशा होता, ते जर नसत ती प्रेमळ फीलिंग आली नसती।  

"कुणाच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आणणे सोपे आहे ,
परंतु आनंदाचे अश्रू आणणे म्हणजे हि खूप मोठी गोष्ट "

जे तुम्ही दोघांनी केले आहे ते आयुष्यभर लक्षात राहील, तुम्ही केलेल्या ह्या गोष्टींची वाह वा सगळेच करत आहेत, माझे घरातले,
मित्र परिवार तुमच्या कामाची दाद देत आहेत। जगातलं सर्वात महागडे गिफ्ट दिल्या बद्दल मनापासून तुमचा आभारी आहे।

हे सगळं चालू असताना अमृता तुझ्या आई बाबांनी सुद्धा एन्जॉय केले ह्यात आम्हाला आनंद आहे। आईने ओवाळणी केली, अवनीला जवळ घेतले, बाबांनी तर "कोणी घर देत का घर" अश्या त्या झालेल्या जोक वर हि मला एक त्यांच्या मित्रांनी पाठवलेला एक msg दाखवला। आम्ही दोघे तो msg वाचून हसत होतो। खरंच किती गोड आहेत तुझे आई बाबा। खरंच नशीबवान आहेस तू अमृता। त्यांना माझा बिग थँक्स सांग। 😘🙏🏻

गेल्या कित्येक वर्षात वाढदिवस साजरे झाले पण तुम्ही जे केले ते मनात घर करून गेले। तुमच्या सर्वाना माझा मनाचा मुजरा। काही हि करा पण मैत्री कधीच तोडू नका। असे मित्र कमवायला बरेच वर्ष गेली माझी आता ती आयुष्यभर सोबत हवी आहेत।

धन्यवाद - सचिन पोटे 🎭