Feedback-
काय होतास तू काय झालास तू,
मित्रांच्या मनात घर करून गेलास तू,
मित्रांच्या मैत्रीचा दिवाना तू,
मित्रांच्या भेटीचा भुकेला तू,
काय होतास तू काय झालास तू...।😘
🙏🏻सॉरी थोडा उशिरा रिप्लाय करतोय.
माझा 🎂वाढदिवस साजरा करण्यासाठी जे तुम्ही केले आहे त्याला कसे शब्दात मांडू हेच कळत नव्हतं। शब्दात मांडून तुम्ही केलेल्या गोष्टीची परतफेड केल्यासारखे नको वाटायला म्हणून गप्प होतो। वाढदिवस आहे म्हणून आपल्याला भेटायचे हे माहित होते व माझं काय करतील आणि काय नाही ह्याची भीती पण होती, पण ते तुम्ही मी घरात घुसतांना दाखवून दिले, नशीब लाईट बंद करून नाही मारलं। बेस्ट वेलकमसाठी बिग थँक्स।
नेहमीसारखी तीच टीम, हाताची बोटे कमी पडावी इतकी मेजोरीटी होती, म्हणून भीती अजून वाढली। रूम मध्ये आल्यानंतर २ मिनिटांनी सगळे जणू कर्फु लागल्यासारखे गायब झाले, २ मानस बाजूला बसवून ठेवली होती, माझ्यावर जणू निगराणी ठेवण्यासाठी एकीकडे मंगेश उर्फ सगळ्यांचा दादा आणि एकीकडे मानसी बेन, हलायला चान्स दिलाच नाही। बाहेर नेमके काय चालू आहे हे पाहावे म्हणून जागेवरून उठलो तर सगळे असे अंगावर धावून आले जणूकाही मी अमृताच्या घरातली किमती वस्तू उचलून निघालो कि काय। हि काळागृहाची शिक्षा केव्हा संपेल असे झालं होतं। हॉल मधली हालचाल काही काळूनच देत नव्हती म्हणून किचन मध्ये काय चाललंय ते पाहावं म्हणून किचन मध्ये गेलो तर राहुल ने मला अक्षरशः असे हाकलले जणू काही मी चुकून लेडीस टॉयलेट मध्ये आलोय कि काय। 😂😂
🕗बराच वेळ हॉल मध्ये बसलेलो, एक एक समोर येवून मनातल्या मनात जणू बोलत असावा "🐐बकरा आज हलाल होणार " असे बोलून पुढे जात होता।
बऱ्याच वेळे नंतर 🗣"चला रे सुरु करू" आवाज आला आणि हृदयाचे❤ ठोके अतुलच्या 🚗💨💨💨गाडीच्या स्पीडने धावू लागले। डोळ्यावरती ओढणी बांधली, आंधळी कोशिंबीर खेळायची आता माझ्यावर राज्य आलंय आणि आता सगळ्यांना पाकडायचं कि काय ? नशीब तस काही नव्हतं।
पण त्यादिवसाचा तो पहिला surprise होता। काय येईल डोळ्यासमोर काहीच अंदाज लावता येत नव्हतं। डोळ्यावरची पट्टी निघाली न डोळ्यासमोर 🚼अवनी 🙋🏻अंकिता दिसली, १०सेकंदासाठी स्तब्ध झालो। नुकताच घरातून येताना जरी दोघींना भेटून आलो असलो तरी बऱ्याच दिवसांनी आज हे मला भेटायला आले असं वाटलं। डोळे पाणावले होते, ह्या सुंदर surprise साठी खूप आभारी आहे तुमचा। थँक्स RJ आणि नितीन त्यांना सांभाळून आणलेस। त्या नंतरचे स्पेसिल सरबत, गिफ्ट्स मध्यल्या भांडी आजही घासावि लागतात, 😁ISI मार्क असलेली शेगडी मला गिफ्ट भेटेल असे मला कधी वाटलंच नव्हतं, सध्या त्या भांड्यावर अवनीचा ताबा आहे। माझ्या बायको ने केलेल्या msg ला तुम्ही इतके मनावर घेऊन चक्क huggies मला गिफ्ट केले हे तर फार गमतीदारच होत।😜😜😜
📝माझ्या कविता खरंच चांगल्या आहेत आणि त्याला मी जपून ठेवायला हवे असे सतत सांगणारे माझे हितचिंतक तुम्ही चक्क बुक बनवून मला गिफ्ट केले। सातव्या आसमानात होतो मी ते पाहून। मी जे करतोय ते खरंच तुम्हाला आवडतंय आणि ते मी इतकं मनावर नाही घेतले कधी, परंतु तुम्ही त्याला अगदी फुलासारखा जपून माझ्या समोर मांडले त्यासाठी खूप खूप थँक्स। मीच केलेल्या कविता मला पुन्हा पुन्हा वाचायला आवडत होत्या। इतकं सुंदर गिफ्टसाठी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार। ह्या मागे केलेली अमृता तुझी मेहनत रंगात आली। 😘
✈दूर देशी गेला बाबाच्या कविता आपण वाचत आलो।👴🏻 बाबा आणि👶🏻 बाळाचं नातं किती नाजूक असतं हे ऐकले आहे । बाबा आपल्या कुटुंबासाठी काय काय करतात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि तुम्ही देखील करत आहातच। अवनीच्या तोंडून आज पर्यंत बाबाबाबाबा असेच ऐकलं होतं। पण अवनी कडून अश्या पद्धतीने bday wish मिळेल वाटलं नव्हतं। कधी imagine पण नाही केले की ही बोलायला लागल्यावर कसे wish करेल मला। पण नंदाने तिच्या माधम्यातून मला ऐकवले त्यासाठी थँक्स नंदा। अतिशय सुंदर विचारांची मांडणी, शब्दांचा सुंदर उपयोग, खूप छान कॉन्सेप्ट आणि आवाज अप्रतिम।😘😘😘
सिद्धार्थ तुझी मेहनत म्हणजे नंदाच्या कामाचा श्री गणेशा होता, ते जर नसत ती प्रेमळ फीलिंग आली नसती।
"कुणाच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आणणे सोपे आहे ,
परंतु आनंदाचे अश्रू आणणे म्हणजे हि खूप मोठी गोष्ट "
जे तुम्ही दोघांनी केले आहे ते आयुष्यभर लक्षात राहील, तुम्ही केलेल्या ह्या गोष्टींची वाह वा सगळेच करत आहेत, माझे घरातले,
मित्र परिवार तुमच्या कामाची दाद देत आहेत। जगातलं सर्वात महागडे गिफ्ट दिल्या बद्दल मनापासून तुमचा आभारी आहे।
हे सगळं चालू असताना अमृता तुझ्या आई बाबांनी सुद्धा एन्जॉय केले ह्यात आम्हाला आनंद आहे। आईने ओवाळणी केली, अवनीला जवळ घेतले, बाबांनी तर "कोणी घर देत का घर" अश्या त्या झालेल्या जोक वर हि मला एक त्यांच्या मित्रांनी पाठवलेला एक msg दाखवला। आम्ही दोघे तो msg वाचून हसत होतो। खरंच किती गोड आहेत तुझे आई बाबा। खरंच नशीबवान आहेस तू अमृता। त्यांना माझा बिग थँक्स सांग। 😘🙏🏻
गेल्या कित्येक वर्षात वाढदिवस साजरे झाले पण तुम्ही जे केले ते मनात घर करून गेले। तुमच्या सर्वाना माझा मनाचा मुजरा। काही हि करा पण मैत्री कधीच तोडू नका। असे मित्र कमवायला बरेच वर्ष गेली माझी आता ती आयुष्यभर सोबत हवी आहेत।
धन्यवाद - सचिन पोटे 🎭
नक्कीच राहील.....
ReplyDeleteThx RJ
ReplyDeleteThx RJ
ReplyDelete