Saturday, October 1, 2016

🌱" १०३ वृक्षांचा विक्रम "🌱

🌱" १०३ वृक्षांचा विक्रम "🌱

जंगल विभाग- महाराष्ट्र सरकार आणि हरियाली -NGO मार्फत आयोजित केलेल्या ह्या प्रयोगाला "उमंग" "उम्मीद" ने त्यांच्या अमूल्य वेळेतुन वेळ काढून आपण ह्या समाजाचे नागरीक आहोत आणि झाडे लावणे आणि ती जगवणे हे आपले कर्त्यव्य आहे हे लक्षात घेता ह्या सुंदर अश्या कार्यासाठी एक पाऊल उचलले आहे।

आज ३जुलै २०१६ हा कार्यक्रम आम्हा सर्वांच्या लक्ष्यात राहणार आहे। आयुष्याला एक वेगळे वळण आम्हाला नक्कीच ह्या कार्यातून मिळेल। झाडे तोडायला ३०मिनिटे सुद्धा भरपूर होतात परंतु तेच झाड लहानाचे मोठे करण्यासाठी लागणारी मेहनत हि खूप मोठी आहे ह्याची जाणीव आम्हाला आज झाली। एक छोटेसे रोप लावताना ते रोप कसे जगेल, अतिपावसाच्या प्रवाहात वाहून जाणार नाही ह्या सर्वांची दक्षता घेऊन आज आम्ही १०३ रोप लावले। 

रोप लावायला सुरुवात करण्या अगोदर आम्ही ३०० ते ४०० रोप नक्कीच लावू असे वाटले होते। परंतु ते रोप लावताना बऱ्याच बारीक बारीक गोष्टींवर लक्ष द्यावे लागते हे पाहताच आम्हाला जास्तीत जास्त झाड लावने हे लक्ष न ठरवता आपल्याला कमी परंतु ती रोप पुढे वाढायला हवी ह्या पद्धतीने लावायला हवी असे ठरले। 

फक्त १०३ रोप लावताना आम्ही बरेच कष्ट केले परंतु लाखो लोकांना लागणाऱ्या रोजची भाजीपाले पुरवण्यासाठी शेतकऱ्यांची मेहनत किती असते ह्याचा अंदाज लावणे कठीण आहे। 

मातीत काम करून शेतकऱ्याची मेहनत हि आज डोळ्यासमोर आली। शेतकऱ्यांच्या ह्या कामगिरीला आणि "हरियाली" सारख्या संस्थेचे रोप लावून त्याचे झाड कर्में ह्या कार्याला *"उमंग" "उम्मीद"* कडून साष्टांग नमस्कार। 

   🌅उमंग - 🌻उम्मीद

।।साद तुमची साथ आमची।।

No comments:

Post a Comment