Saturday, October 1, 2016

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रयत्नात "उमंग"

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या 
तयारीसाठी 92.7 FM ने आयोजित केलेल्या भव्य चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये "उमंग" "उम्मीद" चा सहभाग होता हे पाहून मनाला खूप मोठं समाधान मिळाल आहे।

काम जरी कठीण दिसत होते तरी आपण ते सहज पार पडले ह्याचे मला नवल वाटत।

३५०हुन अधिक मुलांना भांडुप, पवई, वरून घेऊन जाऊन तिथल्या हजारो मुलांमध्ये बसवून, त्या हजारो मधुन आपलेच मुलं शोधून पुन्हा त्यांच्या घरापर्यंत सोडणे हि काही साधी गोष्ट नव्हे। भल्या भल्या संस्थेने तोंडात बोट घालावी अशी बाब आहे।

तिथे टीमचे काम, टीम मधल्या प्रत्येक सदस्यांची आपल्या जबाबदारीकडे पाहण्याचा तो वेगळा दृष्टिकोन, ह्या सर्व गोष्टी निदर्शनात येतात आणि हे पाहून गर्वाने लोकांना सांगावस वाटत कि... हा मी उमंगचा सदस्य आहे।

उमंगच्या मेंबरची हजेरी जरी जास्त असली तरीही उम्मीदची पाठ थोपवावी अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे।

उम्मीद तुमच्या ह्या नेहमीच्या निस्वार्थ कामगिरीला उमंग कडून मानाचा मुजरा।🙏🏻

आपण सगळे जे काही करतो आहोत त्याने आपला दर्जा समाजात उंचवत तर आहेच परंतु आता त्या दर्जाला टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे।

नक्कीच आपण आपली कामं हि अशीच चांगल्या पद्धतीने पार पाडत राहू, समाजाला आपलं जे देण आहे ते देत राहू।

त्यासाठी परमेश्वरा तू सतत सोबत राह

हीच तुझ्या चरणी प्रार्थना।🙏🏻

No comments:

Post a Comment