नमस्कार,
गेल्या कित्तेक दिवसात बरेच वेळा आपण भेटलो,
परंतु प्रत्येक दिवस हा नवाच वाटत होता,
बऱ्याच गप्पा, बऱ्याच भेटी,
तरी मित्रमेळावा हा हवाच होता,
तरी मित्रमेळावा हा हवाच होता....!!!
आपली हि भेट कधीच न विसारण्या सारखी होती।
प्रेम, प्यार, इश्क, मोहब्बत सारख्या शब्दांच पावला पावलावर दर्शन होत होत,
मित्रांमध्ये गुंतुन जाणे हेच खरे जीवन,
मित्र हीच खरी संपत्ती असे वाटू लागले।
प्रत्येक क्षण हा कुठे तरी फ्रेम करून ठेवायला हवा अस वाटत आहे,
रोजच्या जीवनाला वैतागलेल्या जर का असे मित्र मिळाले तर त्याच्या जीवनाची, जीवन जगण्याची व्याख्याच बदलून जाईल,
माझं तुझ्यावरच आणि तुझं माझ्यावरच प्रेम व्यक्त करण्याची भाषाच हि तुम्हा सगळ्यांची वेगळी आहे, जी आज मनात घर करून बसली आहे।
दारात आलेल्या यमाने जर का शेवटची इच्छा विचारली,
तर नक्कीच २०१६ मधल्या मे महिन्यातली हि २ दिवस मागेल,
आणि पुन्हा एकदा एक आयुष्य जगेल।
कळत न कळत काही चुकले असेल तर माफ कर असे नाही म्हणणार,
पण चुकलं असेल तर एकदा ती चूक सुधारण्याचा एक संधी दे असे म्हणेल।
आणि त्यासाठी नक्कीच
तुला /तुम्हाला परत भेटावे लागेल।
काय मग भेटायचं ना...?
💓सचिन💓
Emdum senti
ReplyDeleteEmdum senti haan
ReplyDeleteEmdum senti haan
ReplyDeleteHo re Ammu... Pan mast aahet ha mitr aaple
ReplyDelete