Saturday, October 1, 2016

मैत्रीला हवी तशी सूट...👌

मैत्रीला हवी तशी सूट अन
हवं तितकं बांधून हि घेतात,
पटलं तर वाह वा अन नाहीतर
सरळ तोंडावर बोलतात।

गरज पडली तर मित्रासाठी धावून येतात,
यशाची पायरी चढता चढता मित्राला हि सोबत घेऊन जातात,
रक्ताच्या नात्याला जपावं तितकच
आपलंसं करून जातात।

प्रत्येक शब्दाला खूप हसवतात,
अन प्रत्येक क्षण इतका सुंदर बनवता कि
भेट न झाली म्हणून रडवतात।

मला फक्त तुमच्याच मैत्रीचं हेवा आहे,
कदाचित मागच्या जन्मातील केलेल्या
चांगल्या कामाचा हा दुवा आहे।

माझं फक्त एकच सांगणं आहे,
भेटी फक्त आपल्या अश्या सतत राहुद्या,
मैत्रीच्या आठवणींच्या साठवणीत
मला सतत वाहुद्या।

तूच दिलेस जीवन, तूच दिले मित्र असे देवा,
तुमची मैत्री अन तुम्ही मनाने श्रीमंत आहात,
मला फक्त तुमचाच करून ठेवा।
मला फक्त तुमचाच करून ठेवा।

                      ........🎭©सchin Poटे🎭

No comments:

Post a Comment