आलीस अशी आयुष्यात रंग सप्त घेऊन,
प्रेमाच्या समुद्राची उंच लाट घेऊन...
विस्कटलेल्या आयुष्यात नातं नव घेऊन,
भरकटलेल्या रस्त्यात मार्ग नवा घेऊन...
प्रेमळ हात हातात देऊन,
नि शब्द होऊन,
बरेच काही बोलून ...
टिमटिमनाऱ्या डोळ्यांना आस नवी देऊन,
ना एक झालो जरी, तरीही साथ आयुष्याची घेऊन,
आलीस अशी आयुष्यात रंग सप्त घेऊन...
आलीस अशी आयुष्यात रंग सप्त घेऊन...😍
💞 ©सचिन 💞
No comments:
Post a Comment