काय लिहू तुझ्या बद्दल,
बोलायला तस बरेच काही आहे,
सुरवात करू कुठून कळत नाही,
पण सांगायचं बरंच काही आहे।
पहिल्या भेटी पासून आज वरच,
तुझं माझं घेणं देणं आहे,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला,
तुझ्या सोबत घालवण आहे।
तू तू मी मी करता करता माझं तुला,
आणि तुला माझं होऊन जाणं आहे,
प्रेमाच्या या उत्तुंग समुद्रात,
सामावून तुला घेणं आहे।
का असावं नात आपले असे,
ते आज जाणून घेणं आहे,
तुझ्या माझ्या नात्याला
आज प्रेमाची साक्ष देणं आहे।
आपल्या या प्रेमळ प्रवासाला,
मोहर सोन्याची देणे आहे,
रंग हिरवा दाखवून,
प्रवासाला पुढे नेणं आहे।
प्रवासाला पुढे नेणं आहे।
🎭© सchin Poटे 🎭
No comments:
Post a Comment