Monday, April 17, 2017

प्रेम विवाह....!!!💏

प्रेम विवाह....!!!💏

प्रेम हे असे वेडे तुझ्या प्रेमाचे
मी सगळं सोडून आली,
तुझ्याच घरची होईल राणी
अशी शपथ घेऊन आली।

लेक लाडकी माझ्या बापाची
मी तुझ्याच घरची झाली,
हट्ट सोडून माहेरचा मी
हट्ट तुझे पुरवत आली।

टिकली तुझी, चुडा तुझा,
जोडवी तुझ्या नावाची मी घातली,
झाली फिक्की मेहंदी आता
मी तुझ्या घरची झाली।

राणी सारखी बनवून ठेवेन म्हणालास
बघ वेळ तीच आज कशी आली,
किचन मधलं राज्य माझं,
लाटणं पळपटाची राणी मी झाली।

कर्तव्याच्या जाळ्यामध्ये
अडकवून अशी मी गेली,
सासू-सासरे नाती
आई-बाप ही माझी झाली।

सगळे करते तुझ्याचसाठी,
आई बाप ही सोबत नाही,
तोडून आले बंधन नात्यांचं
आता उरले तुझ्यात सारं काही।

राखीला ही माझ्या आता
हात समोर नाही,
बहिणीची मैत्री आता
स्वप्नात फक्त साथ देई।

चीड चीड तुझी दिवस भराची
माझ्याच कापाळीच ठायी,
वेळ नसतो तुला आता
म्हणे तुला समजत कसं नाही।

उठल्या उठल्या कामावर
जायची असते तुला घाई।
दिवस रात्र हवी असते
तुला सोशल मीडियाची मलाई।

काळ बदलला, विचार बदलले,
आयुष्य हे सुनेचं आता चुली वरच नाही,
घेऊदे मला ही उंच भरारी
स्वयंपाकातच आयुष्य माझं
मला संपवायचं नाही।

येईल रे बाळ जगात आपलं,
त्याला नावही माझं नाही,
खरचं सांग तुझ्या हृदयात
मला जागा उरणार का नाही ?

कोंडली जाते रे तुझ्या प्रेमाच्या भिंतीत
तिला तोडता येत नाही,
तुझ्यापासून दूर राहून
मला एकट जगता येत नाही।

एकच इच्छा पूर्ण कर
मला वेळ दे तुझा काही,
तुटलेल्या या मनाला आता
जगण्याची इच्छा नाही,
जगण्याची इच्छा नाही।

©सchin Poटे 🎭
  (न सांगता ....)

Thursday, April 6, 2017

महागाईची फाशी...!!!

महागाईची फाशी...!!!

कसली आहे ही गडबड
अन कसली ही खिचातानी,
लोकशाहीच्या युगामध्ये या
होणारच की मनमानी।

माझे तुला, तुझे मजला,
होऊ लागली आणीबाणी,
प्रत्येकाला उत्तर देता देता,
झालो घामाने पाणी पाणी।

अन्न, वस्त्र आणि निवारा
झाला आहे महागच जरा,
महागाईच्या या जीवनात
EMI वरच जगतोय जरा।

स्वप्न पाहिले मी माझ्या स्वप्नांचे,
घर दिसले ते समुद्र किनाऱ्याचे,
लाट आली ती महागाईची,
वाळू झालें त्या घराचे।

आजारांची तर आता सवयच झाली,
डॉक्टरांची डिगरी ही पाठ झाली,
ग्लुकोजच्या नावाखाली
केमिकलची ती फळे ही खाल्ली।

सब सी डी च्या नावाखाली
महागाईचा सिलेंडर
घरा घरात गेला,
भुके वाचून गरीब उपाशी
त्याच्या ताटातच मेला।

पक्ष पक्ष नावाचं व्हायरस
आयुष्यात आला,
आश्वासनांचा पोकळ डोंगर
मनात उभारून गेला।

स्वार्थी या समाजात राहण्यास
कसरत मात्र खूपच झाली,
बदलतं सरकार पाहता पाहता,
माणूस पोहचला स्मशानदारी,
माणूस पोहचला स्मशानदारी।

©सchin Poटे 🎭

Saturday, April 1, 2017

असे का ...?

असे का ....???🤔

(जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा...😍)

तू फक्त मैत्रिण नाही
मैत्री पलीकडे आहेस,
तू फक्त प्रेम नाही,
तू प्रेमा पलीकडे आहेस,
तू सुख नाही तू सुखाच्या
पलीकडे आहेस।

तू कधी इंद्रधनुष्य आहेस,
कधी आकाशातील तेजमय
तारा आहेस,
कधी बेधुंद वारा,
तर कधी सागरी किनारा आहेस।

(जेव्हा प्रेम कमी होते तेव्हा...☹)

अलीकडे तू समजून घेत नाही,
तू समजण्या पलीकडे आहेस,
तू पहिल्यासारखी नाही,
तू इतरां सारखीच आहेस।

तू माझी राहिली नाहीस,
तू आता इतरांची आहेस,

मजला तू नको,
तू तुझ्याच मनाची राणी आहेस।
तू तुझ्याच मनाची राणी आहेस।

© सchin Poटे

Friday, March 24, 2017

तू असतीस आयुष्यात...


तू असतीस आयुष्यात
तर बात कुछ ओर असती,
स्वप्नांच्या बागेत फक्त
तुझीच सुगंधी फुले असती...

गुलाबाचा सुगंध तू होऊन
आयुष्यात सतत दरवळत असती,
लाजाळूच्या पानासारखी स्पर्श होताच
स्वतःलाच कवटाळली असती...

आली असतीस आयुष्यात
सदाफुली सारखी सदा
फुलत (हसत) तू राहणारी,
वेड्यासारखं प्रेम करून हि
"मैत्रीचं" नाव तू देणारी...

झालो असतो तुझा मी
आपले हि छान आयुष्य रंगले असते,
मनातल्या शब्दांना तुझ्या
ओठांवरती जर तू आणले असते...

अग वेडे आयुष्य माझं चंदना सारखं
सुगंधित झालं असतं,
जर तुझ्या त्या कोड्यात
म्हटलेल्या शब्दांना
मी तेव्हाच समजून घेतलं असतं...
मी तेव्हाच समजून घेतलं असतं...

©सchin Poटे 🎭

Tuesday, March 7, 2017

आज "ती" चा दिवस....!!!

आज "ती" चा दिवस...

ती जिने मला जन्म दिला,
ती जिने मला राखीचा मान दिला,
ती जिने शिक्षणाचा मार्ग दिला,
ती जिने मैत्रीचा हात दिला,
ती जिने प्रेमाचा डोंगर दिला,
ती जिने आयुष्यभर सोबत
राहण्याचा वादा केला,
दमून येताच घरी मला पाहताच
जिने लव्ह यु बाबा केला....

त्या प्रत्येक "स्त्री" ला सलाम..!!!

©सchin Poटे🎭

Tuesday, February 28, 2017

न सांगता....💞

❣न सांगता .... 😌

(ती म्हणाली...)
*न सांगता* कधी तरी वाटे कळावे
*न सांगता* जाणुनी तू घ्यावे...
*न बोलता न सांगता* गुंज ऐकावे मनाचे
आनंद द्यावा कधी  तरी *न सांगता.....*

👇🏻
(मी म्हणालो..)
*न सांगताच* तुझाच झालो,
*न सांगताच* तुझ्यासाठीच आलो,
*न सांगताच* प्रेम निस्वार्थ घेऊन आलो,
*न सांगताच* प्रेमात तुझ्या बहरू लागलो...

*न सांगताच* मैत्री करीत राहिलो,
*न सांगताच* मैत्रीसाठी झूरु लागलो,
*न सांगताच* मैत्रीची माळ गुंफत राहिलो,
*न सांगताच* मैत्रीच्या नाजूक क्षणांना,
फुलासारखा जपत राहिलो...

*न सांगताच* स्वप्न तुझे पाहत राहिलो,
*न सांगताच* स्वप्नात तुझ्या येत राहिलो,
*न सांगताच* तुझ्या माझ्या भेटी वाढल्या,
बघता बघता शिखरा एवढ्या
आठवणी साठल्या,
अन आठवणी त्या प्रेमाला आपल्या
स्वप्नात सजवू लागल्या...

न कळावे हृदय स्पंदने हि
तुझ्याच स्पर्शाने का वाढावे,
जवळीक साधता तुझ्या एका मिठीची,
वेड दोघांत हि का लागावे...

प्रेम असे कसे हे अवघड,
तरीही दोघे एकमेकांवर करू लागलो,
*न सांगताच* मनाला आपल्या,
दोघे एकमेकांत गुंतू लागलो...

*न सांगताच* तुझ्या मनाला समजू लागलो,
प्रेम आहे तुझे अफाट माझ्यावर
ते अनुभवू लागलो,
खरंच सांगतो....
*न सांगता* मी तुझ्या प्रेमासाठी
देवाकडे हि भांडू लागलो,

*न सांगताच* प्रश्न असे हे सतत
मनाला पोखरून का जावे,
प्रेम केले वेड्यासारखे हे
*न सांगता* तुला अन मलाच कळावे...

अखेर प्रेमाचा काय असावा हे
मीच रंगवू लागलो,
*न सांगताच* माझ्या नशिबाला,
मीच सतत कोसू लागलो,
*न सांगताच* माझ्या मनाला मीच
समजवू लागलो...
*न सांगताच*माझ्या मनाला मीच
समजवू लागलो...

©सchin Poटे 🎭

Tuesday, November 22, 2016

तू नसावी सोबत....😘

तू नसावी सोबत असा दिवस नसावा,
तूच असावी सोबत,
असा प्रत्येक क्षण असावा,
भेट तुझी निरंतर असावी परंतु, 
घडाळ्याच्या काट्यानांही थांबण्यास खंत नसावा।

भेट तुझी देई मज सुंदर विसावा,
क्षण हा आयुष्यात माझ्या रोज असावा,
भेटीला आपल्या कुणाचा नकार नसावा,
असा क्षण माझ्या डोळ्यांनी रोज मी पहावा।

झाली मैत्री हि अतूट ह्यात दुरावा नसावा,
झालो तुझ्यात जितका मी बेधुंद,
तितका दुसरा कोणी नसावा,
लावले वेड ज्याने तुला प्रेमाचे, 
तो फक्त मीच असावा।

तू नसावी सोबत असा दिवस नसावा,
तूच असावी सोबत,
असा प्रत्येक क्षण असावा।

🎭© सchin Poटे 🎭