Saturday, October 1, 2016

प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं...

प्रथमच मला एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावले गेले होते। वयाच्या २९व्या वर्षी पाहुणे म्हणून बोलावणं म्हणजे जरा जास्तच अवघडलेले झालं होतं। मी माझे मित्र सुद्धा सोबत होते। कल्पेश, मीनल, प्रशांत हा आमचा पहिलाच अनुभव। एकाच वर्गात लहानपणापासून बसणारे आम्ही चक्क एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गेलो हे खूप आनंदी दायी होते।

आम्हाला कार्यक्रमाला बोलावणारे कल्पेशचे नातेवाईकच होते म्हणून आमचा पाहुणचार तसा छानच झाला। आम्ही येणार ह्यासाठी तिथले रहिवाशी कित्तेक वेळ वाट पाहत होते। प्रमुख पाहुणे कोण आहेत, कसे आहेत असे प्रश्न नक्कीच त्यांच्या मनात घर करून बसले होते। कोणीतरी वयाने मोठे, प्राध्यापक, नगरसेवक वगैरे कोणी असेल असे त्यांना वाटले असावे। परंतु आम्हा चौघांना पाहून त्यांनी आश्चर्याने आमच्याकडे पहिले असावे।

आम्हाला उमंगचे कार्यकर्ते म्हणून बोलावले होते । आम्ही आमचा ५ वर्षाचा प्रवास कसा केला हे त्यांच्या समोर मांडायच होत आणि त्यांच्या नवीन कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला बोलावले होते।

(तिथले भाषण)

नमस्कार, 

मी सचिन पोटे। इथे बसलेल्या सर्व मान्यवरांचा आणि इथे जमलेल्या गावकऱ्यांचा मानापासून आभार मानतो कि त्यांनी आम्हाला इथे यऊन २ शब्द बोलण्याची संधी दिली। आमचे मत, आमचे अनुभव, आमचे विचार तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा मार्ग उभा केला त्यासाठी ह्या संस्थेचा मी खूप आभारी आहे।

बऱ्याच गोष्टी समजण्या पलीकडच्या आहेत पण त्या अश्या का हे समजून घेण्याला आपण इथे आलो आहोत। चांगले वाईट काय हे सगळ्यांनाच कळात परंतु कळतंय पण वळत नाही अशी दशा आज आपली झाली आहे।

इथे बसलेल्या प्रत्येकाला वाटत असेल किंवा आहे वाटत आहे की मी असे काहीतरी करावं कि कि जेणे करून मला लोकांनी माझ्याशी बोलताना माझ्या कडे पाहताना आदराने पाहायला हवे। तो एक सन्मान मला समजत मिळायला हवा। माझ्याकडे बघताना आदरयुक्त भीती लोकांच्या मनात वाटायला हावि। पण मग त्या गोष्टी कश्या साध्य करता येतील ह्या वर आपण विचार विनिमय करायला हवा ।

मी उमंग ह्या संस्थेचा कार्यकर्ता आहे। गेल्या सलग ५ वर्षी पासून ह्या संस्थे सोबत मी काम करतोय। मला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला गेला की काय मिळत रे समाज कार्य करून, फॅमिली ला वेळ द्या घरातले उद्योग काय कमी असतात का तिकडे जरा लक्ष द्या।  उगाच आयुष्य वाया घालवू नका।

मी त्या वेळेला त्याच क्षणी त्या व्यक्ती ला हे सांगितलं की तुम्ही त्या विचारांचे व्यक्ती आहात जी माणसे इतरांच्या चांगल्या मध्ये कधीच सह्भाक करून घेऊ शकत नाही। तुम्ही केव्हाच चांगले करू शकणार नाही नाही आणि कुणाला करून हि देणार नाही।

काय मिळते मला हे समाज कार्य करून? 

आनंद मिळतो,

समाधान मिळत,

प्रेरणा मिळते,

प्रॉसहन मिळत,

आयुष्य कडे पाहण्याचा एक वेगळा दृहतीने मिळतो,

काहीतरी चांगले करण्याच्या कित्तेक संधी मिळतात,

आणि मी करत असलेल्या चांगल्या कामामुळे माझ्या परिवाराच्या चेहर्यावरचा तो आनंद मिळतो,

माझ्या मुलांना माझ्या कडे पाहताना गर्व वाटावा म्हणून ही धडपड आहे। जॉब काम धंदा फॅमिली मित्र समाज ह्या सगळ्या गोष्टी कधीच तुमच्या पासून दूर हिणार नाही। ही जीवनाची सायकल आहे ती काही थांबणार नाही। 

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणतेही केलेलं काम वाया जात नाही त्या केलेल्या गोष्टीने एकतर आपण जिंकतो किंवा काही तरी शिकतो परंतु माणूस काढिच हारत नाही। 

*नाते कितीही वाईट असले तरी*
*ते कधीही तोडू नका*,
*कारण पाणी कितीही घाण*
*असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते*...
*"माणुस*" *स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे*...,

*लोकांच काय लोक " चुका" तर "देवात" पण काढतात*.

रतन टाटा छान बोलतात कि लोखंडाचा गंजच लोखंडाचा नष्ट करतो, तसेच आपले विचारच आपल्याला नष्ट करू शकतात म्हणून विचार बदला आयुष्य नक्कीच बदलेल।

धन्यवाद...

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. समाजकार्य तर माहित नाही पण खरंच मनाला खूप समाधान आणि आनंद मिळतो आणि उमंग चा अभिमान आहे आणि तुमचा पण सचिन, मीनल , कल्पेश आणि प्रशांत

    ReplyDelete